बस दरीत कोसळून अपघात; 5 ठार, 25 जखमी

वृत्तसंस्था
रविवार, 11 डिसेंबर 2016

नालंदा (बिहार) - नालंदा जिल्ह्यात बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 5 जण ठार झाले सून 25 जण जखमी झाले आहेत.

नालंदा (बिहार) - नालंदा जिल्ह्यात बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 5 जण ठार झाले सून 25 जण जखमी झाले आहेत.

नालंदा जिल्ह्यातील झाडू बिगा येथूल वळणावर बस दरीत कोसळली. नालंदाचे जिल्हाधिकारी डॉ. तियागराजन, पोलिस निरीक्षक कुमार आशिष आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची नुकसानभरपाई देणार असल्याची घोषणा केली आहे. "या अपघातात किमान 5 प्रवासी ठार झाले असून 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे', अशी माहिती नालंदाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Five killed, 25 injured after bus falls into ditch