Maratha Reservation : देशभरात सुरु आहेत आरक्षणासाठीचे लढे!

टीम ई-सकाळ
गुरुवार, 27 जून 2019

- देशभरात पाच समाजाकडून करण्यात आली आरक्षणासाठी मागणी.

नवी दिल्ली : मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीला जोर दिला जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणानंतर देशभरातील काही समाजाकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे. यामध्ये जाट, मराठा, पटेल समाजाकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे.

मराठा आरक्षण : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रात विविध आंदोनले, मोर्चे, रॅली काढण्यात आली. या समाजातील बांधवांना शिक्षणासह नोकरीत आरक्षण मिळावे, यासाठी मोर्चे काढण्यात आली. 

Image may contain: crowd, plant, tree, outdoor and nature

जाट आरक्षण : जाट समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी हरियानातील जनता प्रामुख्याने आग्रही आहे. जाट आरक्षणासाठी हरियानात आंदोलनही करण्यात आले होते. या आंदोलनाला हिंसक वळणही मिळाले होते. या आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे 35 हजार कोटींचे नुकसान झाले होते. जाट समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, अशी मागणी केली जात होती. मात्र, सध्या दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये जाट समाजाचा समावेश ओबीसी कोट्यात करण्यात आला आहे. 

Image may contain: one or more people and outdoor

पटेल आरक्षण : पटेल समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गुजरातमध्ये आंदोलन छेडण्यात आले. यामध्ये पाटिदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी राज्यात आंदोलने केली. हरियानासारखे गुजरातमध्येही आंदोलन छेडण्यात आले होते. पटेल समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जुलै 2015 मध्ये आंदोलने करण्यात आली. या आंदोलनादरम्यान हार्दिक पटेल यांना अटक करण्यात आली होती. संतप्त जमानाने सार्वजनिक वाहनांचे नुकसान केले होते. 

Image may contain: 7 people, crowd and outdoor

गुज्जर आरक्षण : गुज्जर समाजाकडून आरक्षणासाठी 10 दिवस विरोध करण्यात आला होता. मे 2015 मध्ये यासाठी आंदोलने, निदर्शने, मोर्चे काढण्यात आले होते. गुज्जर समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी संतप्त आंदोलकांनी रेल्वे रोको केला होता. त्यामुळे त्यावेळी रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला होता. 

Image may contain: one or more people, sky and outdoor

 

कापूस आरक्षण : आंध्र प्रदेशातील कापू समाजाकडून आरक्षणासाठी आंदोलन छेडण्यात आले होते. कापू समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करण्यात आले होते. यासाठी तीन दशकांपासून मागणी केली जात आहे. 

Image may contain: cloud, sky, crowd and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five Major Communities Leading Protests And Demanding Caste Based Reservations Across India