झारखंडमध्ये चकमकीत पाच माओवादी ठार 

वृत्तसंस्था
बुधवार, 4 एप्रिल 2018

लत्तेहार (झारखंड) : लत्तेहार जिल्ह्यात सेरेनडागच्या जंगलात आज सकाळी झालेल्या धुमश्‍चक्रीत सुरक्षा दलाने पाच माओवाद्यांना ठार केले. घटनास्थळाहून दोन एके 47 रायफल्स, एक इन्सास रायफल जप्त करण्यात आली.

मृतांपैकी दोन माओवाद्यांची ओळख पटली असून, शिवलाल यादव आणि सर्वन यादव अशी त्यांची नावे आहेत. 

माओवाद्यांचा गट सेरेनडागच्या जंगलात असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार आज सकाळी सीआरपीएफच्या जवानांनी एकाच वेळी जंगलात हल्ला केला.

पोलिसांनी माओवाद्यांना चारही बाजूंनी घेरले. पोलिस येताच माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच माओवादी जागीच मारले गेले. पोलिसांनी मनिका, लत्तेहार, हेरहंज आणि पांकी या गावाकडे जाणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करून कसून चौकशी केली.

Web Title: Five Maoist dead in encounter with Security Forces