धक्कादायक! भारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 60 टक्के रुग्ण 5 राज्यात

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 18 September 2020

जगभरात कोरोनाचा प्रसार वाढतच चालला आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. धक्कादायक म्हणजे भारतात सध्या जेवढे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाचा प्रसार वाढतच चालला आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. धक्कादायक म्हणजे भारतात सध्या जेवढे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यातील 60 टक्के रुग्ण देशातील सर्वाधिक बाधित असणाऱ्या पहिल्या पाच राज्यात आहेत. दुसऱ्याबाजूला दिलासादायक म्हणजे देशात अशीही 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथं 5 हजारांपेक्षा कमी कोरोनाचे रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिली आहे. 

मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 96 हजार 424 रुग्ण वाढले असून 1,174 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील कोरोना बाधित झालेल्यांची संख्या 52 लाखांच्या वर गेली आहे. आतापर्यंत देशात 52 लाख 14 हजार 678 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारपर्यंत देशात 41 लाख 12 हजार 552 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच आतापर्यंत 84 हजार 372 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  मोदींना वाढदिवसाला काय हवं आहे?

 

देशात गुरुवारी एका दिवसात कोरोनाच्या 10 लाख 6 हजार 615 चाचण्या झाल्या आहेत. गुरुवारच्या झालेल्या चाचण्या धरुन देशात आतापर्यंत 6 कोटी 15 लाख 72 हजार 343 कोरोना चाचण्या झाल्या असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

गुरुवारी महाराष्ट्रात 24 हजार 619 कोरोनाच्या नवीन रुग्ण आढळले आहेत. तर मागील 24 तासांत 398 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्यात कोरोनाने 31 हजार 351 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी एका दिवसात तब्बल 19 हजार 522 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण 3 लाख 1 हजार 752 उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 8 लाख 12 हजार 354 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five most corona infected states in india