रुग्णालयाच्या 'आयसीयू'तील एसी निकामी झाल्याने पाच रुग्णांचा मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 जून 2018

लाला लजपत राय रुग्णालयातील आयसीयूतील एसी प्लांट खराब झाला. त्यामुळे 5 रुग्णांचा मृत्यू झाला. या हॅलेट रुग्णालयात चार बालकांसह 11 रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.

कानपूर : उत्तरप्रदेशातील कानपूरमधील एका सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील (आयसीयू) एसी प्लांट खराब झाल्याने येथील पाच रुग्णांचा मृत्यू झाला. ही घटना कानपूरमधील लाला लजपत राय रुग्णालयात (हॅलेट रुग्णालय) काल (गुरुवार) रात्री घडली. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

लाला लजपत राय रुग्णालयातील आयसीयूतील एसी प्लांट खराब झाला. त्यामुळे 5 रुग्णांचा मृत्यू झाला. या हॅलेट रुग्णालयात चार बालकांसह 11 रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.

मागील काही दिवसांपासून रुग्णालयाच्या आयसीयूतील एसी बंद पडला होता. त्यानंतर मात्र, रुग्णालयातील सर्व एसी बंद पडले. ओव्हर हिटिंगमुळे एसी बंद पडल्याचे सांगितले जात आहे. एसीची वेळेवर देखभाल न केल्याने एसीमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मागील वर्षी गोरखपूरच्या बीआरडी रुग्णालयात एका आठवड्यात 70 हून अधिक बालकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही घटना घडली. 

Web Title: Five Patient Died Due To AC Plant Shut Down In Kanpur Hailut Hospital