esakal | देशात पाच राज्यांत कोरोनाचा उद्रेक; दिल्लीतच सापडतातय जास्त रुग्ण, काय आहे कारण?
sakal

बोलून बातमी शोधा

five states having huge number of covid positive patients

महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या पाच सर्वाधिक कोरोनाग्रस्त राज्यांच्या तुलनेत दिल्लीत आरटी-पीसीआर चाचण्यापेक्षा रॅपीड एँटिजेन टेस्ट जास्त प्रमाणात घेण्यात येत आहेत.

देशात पाच राज्यांत कोरोनाचा उद्रेक; दिल्लीतच सापडतातय जास्त रुग्ण, काय आहे कारण?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली New Delhi :  मार्चमध्ये भारतात पहिल्यांदा कोरोनाचे रुग्ण आढळल्यावर देशात कोविड-19च्या 'टेस्टिंग' योग्यरित्या झाल्या नसल्यामुळे त्यावेळेस देशात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला होता. कोरोनाचा फैलाव अजूनही भारतात कमी व्हायचं काय नाव घेताना दिसत नाहीये. पण, आता देशात कोरोना संशयितांच्या टेस्टिंग पुरेशा होत असल्याने कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. देशात रोज 70 हजार नवीन रुग्ण मिळत आहेत. महाराष्ट्र, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश ही राज्ये कोरोनाने सर्वाधिक फटका बसलेली राज्ये आहेत.

दिल्लीत बदलली टेस्टिंगची पद्धत
सुरुवातीला दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण भरपूर वाढले होते. पण, योग्य नियोजन आणि वेळेत मिळालेल्या उपचारामूळे दिल्लीने कोरोनाचा प्रसार बऱ्यापैकी नियंत्रणात आणला होता. आता पुन्हा नव्याने दिल्लीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. याचं एक कारण दिल्ली सरकारने बदललेली टेस्टिंग  पध्दत असल्याचे तज्ञांचे मत आहे. जुलै महिन्यापासून दिल्लीत कोविड-19 चाचण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या दिल्ली सरकार कोरोनाची चाचणी घेण्यासाठी 'रियल-टाइम पॉलिमरेज चेन रिएक्शन' ( real-time polymerase chain reaction- RT-PCR) ऐवजी 'रॅपीड एँटिजेन टेस्ट' ( rapid antigen tests- RAT) जास्त प्रमाणात घेत असल्याचे आढळले आहे. भारतातील जवळजवळ सर्व राज्ये कोरोना चाचणीसाठी रियल-टाइम पॉलिमरेज चेन रिएक्शन वापरत आहेत, जरी याच्या निकालाला तुलनेत जास्त वेळ असेल तरी, याची अचूकता रॅपीड एँटिजेन टेस्टपेक्षा जास्त आहे. आता या दिल्ली सरकारच्या टेस्टिंगवर वाद निर्माण होत आहे,  कारण उच्च न्यायालयाने RT-PCR टेस्ट करण्यास सांगितले होते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पाच राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक
महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या पाच सर्वाधिक कोरोनाग्रस्त राज्यांच्या तुलनेत दिल्लीत आरटी-पीसीआर चाचण्यापेक्षा रॅपीड एँटिजेन टेस्ट जास्त प्रमाणात घेण्यात येत आहेत. सध्या दिल्ली भारतात सध्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत सहाव्या स्थानी आहे. दिल्लीत 30 जून ते २० ऑगस्ट दरम्यान  आरटी-पीसीआरपेक्षा रॅपीड एँटिजेन टेस्टचे प्रमाण दुप्पटपेक्षा जास्त होते. या दरम्यान 6 लाख 41 लाख 529 रॅपीड एँटिजेन टेस्ट आणि 3 लाख 28 हजार 300 आरटी-पीसीआर टेस्ट झाल्या होत्या.

14 जूनला इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर-ICMR) कंटेनमेंट झोनसाठी रॅपीड एँटिजेन टेस्ट करणास परवानगी दिली होती. जर रॅटची चाचणी पॉसिटीव्ह आली तर, त्या रुग्णावर त्वरीत कोविड केस म्हणून रुग्णालयात भरती केलं जात होत. रॅटची चाचणी निगेटिव्ह आली तर, त्या रुग्णाची आरटी-पीसीआर टेस्ट घेतली जाऊन नक्की केलं जात होतं. यावरून RT-PCR टेस्टिंग पध्दतीच योग्य असल्याचं सिध्द होतंय.  19 ऑगस्टला दिल्ली हायकोर्टाने दिल्लीत रोज सरासरी 1300 रुग्ण वाढत असल्याने, याची दखल घेतली होती. याबद्दल म्हटले आहे की, दिल्लीत याकाळात रॅट टेस्टचे प्रमाण वाढलं आहे आणि आरटी-पीसीआर टेस्टची संख्या कमी झाली होती. यामूळे जुलै महिण्यात कमी झालेले कोरोनाचे रुग्ण ऑगस्ट महिण्यात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसले आहेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अचूकतेचं प्रमाण कमी
दिल्लीत रॅपीड एँटिजेन टेस्ट का केलं जात आहे, असा प्रश्नही निर्माण होत आहे. सामान्यपणे रॅपीड एँटिजेन टेस्टचा निकाल 30 मिनिटांत येतो आणि  रियल-टाइम पॉलिमरेज चेन रिएक्शन टेस्टचा निकालाला तुलनेत जास्त वेळ लागतो. या कारणामूळे देखील दिल्ली सरकार पर्याय वापरत असेल. पण, रॅपीड एँटिजेन टेस्टची अचूकता रियल-टाइम पॉलिमरेज चेन रिएक्शन टेस्टपेक्षा कमी आहे.