शोपियाँमध्ये झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
रविवार, 6 मे 2018

भारतीय लष्करातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तसेच या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत.

जम्मू काश्मीर : भारतीय लष्करातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तसेच या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. ही चकमक जम्मू काश्मीरच्या शोपियाँ भागात घडली. यासाठी भारतीय लष्कराकडून 'मिशन ऑल आऊट' हाती घेण्यात आले.

military encounter india

या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सद्दाम पाडर याच्यासह पाच जणांचा खात्मा करण्यात आला. या मोठ्या कारवाईमुळे कुख्यात दहशतवादी बुरहान वानीची संघटना पूर्णपणे नष्ट झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये सद्दाम पाडरसह बिलाल मौलवी, डॉक्टर मुहम्मद रफी भट्ट आणि आदिल मलिकचा समावेश आहे. रफी भट्ट हा काश्मीर विद्यापीठाचा प्राध्यापक असल्याची माहिती मिळत आहे. यातील पाचही दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराने ताब्यात घेतले असून, परिसरात शोधमोहिम अद्यापही सुरु करण्यात आली आहे. 

दरम्यान, आत्तापर्यंत भारतीय लष्कराने सुरु केलेल्या 'ऑपरेशन ऑल आउट'च्या माध्यमातून यावर्षी तब्बल 59 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे.

Web Title: Five terrorists killed in Shopian encounter 2 security personnel injured