फ्लिपकार्टचा तोटा 3,200 कोटींवर

flipkart
flipkart

बंगळूर : ई- कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात 3 हजार 200 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. ऍमेझॉनशी वाढलेल्या स्पर्धेमुळे कंपनीच्या तोट्यात 70 टक्के वाढ झाली आहे.

फ्लिपकार्ट इंडिया आणि फ्लिपकार्ट इंटरनेट या दोन फ्लिपकार्टच्या उपकंपन्या आहेत. फ्लिपकार्ट इंडियाकडून घाऊक व्यवसाय सांभाळला जातो. तिच्या तोट्यात 750 टक्के वाढ होऊन तो 2 हजार कोटी रुपयांवर गेला आहे. फ्लिपकार्ट इंटरनेटकडून ऑनलाईन व्यवहार पाहिले जातात. तिला 1 हजार 100 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. फ्लिपकार्ट इंडियाला मार्च 2017 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात 244 कोटी रुपयांचा तोटा झाला होता, तर मार्च 2016 अखेर संपलेल्या तिमाहीत 545 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीचे आक्रमक व्यवसाय धोरण आणि मोठ्या प्रमाणात दिलेल्या सवलती यामुळे कंपनीला मोठा तोटा झाला आहे. तज्ञांच्या मते, कंपनीला 2020 पर्यंत तोट्याला सामोरे जावे लागेल. पुढील काळात कंपनीची ऍमेझॉनशी स्पर्धा आणखी वाढणार आहे. यामुळे तोटा कायम राहण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com