फ्लिपकार्टच्या बिन्नी बन्सल यांनी 531 कोटींना विकले शेअर्स!

Binny_Bansal
Binny_Bansal

नवी दिल्ली : फ्लिपकार्टचे सहसंस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अध्यक्ष बिन्नी बन्सल यांनी आपला आणखी हिस्सा वॉलमार्टला विकला आहे. आपल्या फ्लिपकार्टच्या हिश्यामधील आणखी 54 लाख इक्विटी शेअर बन्सल यांनी वॉलमार्टला विकले आहेत. बिन्नी बन्सल यांनी 5,39,912 शेअर 531 कोटी रुपयांना (7.64 कोटी डॉलर) वॉलमार्टला विकले आहेत. त्यामुळे आता फ्लिपकार्टमधील हिस्सा 3.85 वरून घटून 3.52 टक्क्यांवर आला आहे.

मागील वर्षी बन्सल यांनी आपला हिश्यातील काही भाग वॉलमार्टच्याच एका सहाय्य्क कंपनीला विकला होता. तसेच मागील वर्षीच बन्सल यांनी फ्लिपकार्टच्या अध्यक्षपदाचा आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला होता. सचिन बन्सल यांच्याबरोबर बिन्नी बन्सल यांनी 2007 मध्ये 'फ्लिपकार्ट'ची स्थापना केली होती. मे 2018 मध्ये 'वॉलमार्ट'ने भारतातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्टमधील 77 टक्के हिस्सा तब्बल 16 अब्ज डॉलरला विकत घेतला होता.

एका माहितीनुसार, फ्लिपकार्ट 2022 पर्यंत अमेरिकेतील शेअर बाजारात नोंदणी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे अमेरिकेत आगामी काळात या कंपनीचा आयपीओ येऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com