ईशान्येकडील राज्यांत पावसाचा धुमाकुळ, आतापर्यंत १३१ जणांचा मृत्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

floods in assam 2022

मान्सूनमुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

ईशान्येकडील राज्यांत पावसाचा धुमाकुळ, आतापर्यंत १३१ जणांचा मृत्यु

सध्या मान्सूनने देशात सर्वत्र हजेरी लावल्याने पावसाने सुरुवात केली आहे. आज सकाळपासून महाराष्ट्रातील काही भागांत पावसाने रिपरिप सुरु केली आहे. दरम्यान, मान्सूनमुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये (North East States Floods) अतिवृष्टीमुळे झाल्याने अनेक गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

ईशान्येकडील काही राज्यांत भूस्खलनाच्या घटना घडल्या असून यात तब्बल १३१ जणांचा मृत्यू झाला आहे. तुफान पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांचे हाल होत आहेत. या आस्मानी संकटाचा सामना सध्या आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश ही राज्य करत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने सर्व राज्यांना पूर्ण मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. (floods in assam 2022)

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) ने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्यात ११ मृत्यूची नोंद झाली, त्यापैकी आठ मृत्यू ३२ पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये झाले आहेत. तर इतर पाच जिल्ह्यांत दोन मुलांसह लोक बेपत्ता आहेत. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक आसाम आणि मेघालयातील पूरग्रस्त भागात पाठवले जाईल. केंद्र या भागातील लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, असं केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आलेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी मेघालयात गेल्या एका आठवड्यात सामान्यपेक्षा १७२ टक्के जास्त पाऊस झाला. आसाममध्ये १०० टक्के जास्त आणि अरुणाचल प्रदेशात सरासरीपेक्षा २८ टक्के जास्त पाऊस झाला आहे. आसाममधील ३६ पैकी ३२ जिल्ह्यांमध्ये ४७,७२,१४० लोकांना पुराचा फटका बसला आहे. ASDMA च्या बुलेटिननुसार, आणखी ११ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या ८२ वर पोहोचली आहे.