मुल्लापेरियार धरणातील विसर्गामुळे केरळात पूर; केरळ सरकारचा आरोप

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : केरळ राज्यातील पूरामुळे तमिळनाडूतील मुल्लापेरियार जलाशयातील पाण्याची पातळी 31 ऑगस्टपर्यंत 139 फूटापर्यंतच ठेवावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तमिळनाडू व केरळ सरकारला एकमेकांना सहकार्य करण्याबाबत व त्यानुसार सूचना पाळण्याबाबत आदेश देण्यात आले. 

मुल्लापेरियार धरणातून अचानक सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे केरळात पूर आला, हे या पूराचे एक कारण आहे, असे केरळ सरकारने सर्वोच्च न्यायालयला सांगितले. यावर तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी हे आरोप धुडकावून लावले आहेत. 

'केरळ सरकारचे आरोप हे बिनबूडाचे आहेत. फक्त मुल्लापेरियार धरणाचे पाणी सर्व केरळात पसरू शकत नाही. तर केरळातील 80 धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे इतक्या मोठ्य़ा प्रमाणात केरळात पूर आला.' अशी माहिती पलानीस्वामी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. 

केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी गुरूवारी (ता. 23) सर्वोच्च न्यायालयाकडे तक्रार केली होती की, पूरपरिस्थितीतही तमिळनाडू सरकार हे पाणी न सोडण्याच्या आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने आज तमिळनाडू सरकारला आदेश दिले.  
  
Web Title: flood in kerala due to release water from mullaperiyar dam, alleged by kerala government