बिहार, आसाममध्ये पूर; बळींची संख्या 139 वर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जुलै 2019

बिहार आणि आसाममध्ये आलेल्या पुराचा 1.15 कोटी नागरिकांना फटका बसला असून, मृतांची संख्या 139 वर पोहोचली आहे. बिहारमध्ये पुरामुळे काल 14 जण मरण पावल्याने मृतांची संख्या 92 वर गेली असून, आसाममध्ये 11 जण मरण पावल्याने मृतांची संख्या 47 वर गेली आहे.

पाटणा/ गुवाहाटी : बिहार आणि आसाममध्ये आलेल्या पुराचा 1.15 कोटी नागरिकांना फटका बसला असून, मृतांची संख्या 139 वर पोहोचली आहे. बिहारमध्ये पुरामुळे काल 14 जण मरण पावल्याने मृतांची संख्या 92 वर गेली असून, आसाममध्ये 11 जण मरण पावल्याने मृतांची संख्या 47 वर गेली आहे.

बिहारमध्ये बारा जिल्ह्यांतील 66.76 लाख, तर आसाममधील 27 जिल्ह्यांतील 48.87 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या बिहारच्या सीतामढी जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. अररिया, मधुबनी, पूर्णिया, शिवोहर आणि दरभंगा हे जिल्हेही पुराशी झुंजत आहेत.

पूरग्रस्तांच्या बँक खात्यांत बिहार सरकारने आतापर्यंत 181.39 कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे. आसाममध्ये 1.79 लाख हेक्‍टर शेतजमीन पाण्याखाली गेली असून, काझीरंगा अभयारण्याचा नव्वद टक्के भाग पुरात बुडाला आहे. धुबरी, मोरिगाव आणि बरपेटा या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Floods in Bihar and Assam 139 Peoples Died