देशभरात जीएसटीचे विक्रमी संकलन, 10 टक्क्यांची वाढ- अर्थमंत्री सीतारमण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

या पत्रकार परिषदेत निर्मला सितारामण म्हणाल्या की, अर्थव्यवस्थेची अवस्था खुप सुधारली आहे.

नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था आता सावरत आहे. देशातील कोरोना प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. या फटक्यामुळे अर्थव्यवस्थेचे बरेचसे नुकसान झाले होते. मात्र, भारतात मागे केलल्या काही उपाययोजनांमुळे आपली अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर सावरत आहे. देशात रेकॉर्डब्रेक अशा जीएसटीचा परतावा झाला आहे. देशी तसेच परदेशी गुंतवणुकीतही मोठी वाढ झाली आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज दुपारी एक वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर देखील उपस्थित होते. त्यांनी म्हटलं की, गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत यावर्षी ऑक्टोबर महिन्यात जीएसीटीचा परतावा हा 10 टक्क्यांनी वाढला आहे. 

हेही वाचा - उमा भारतींना तेजस्वीचं कौतुक; म्हणाल्या, तो राज्याचे नेतृत्व करु शकतो, पण...

या पत्रकार परिषदेत निर्मला सितारामण म्हणाल्या की, अर्थव्यवस्थेची अवस्था खुप सुधारली आहे. कोरोना व्हायरसचे ऍक्टीव्ह रुग्णदेखील कमी झाले आहेत. ते 10 लाखावरुन घटून 4.89 लाख झाले आहेत. कोरोना व्हायरसचा मृत्यूदर घटूव 1.47 टक्के झाला आहे. पुढे त्यांनी म्हटलं की, आत्मनिर्भर भारत 0.1 मधल्या घोषणांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. वन नेशन वन, रेशन कार्ड योजने अंतर्गत 28 राज्यांमधील  68.8 कोटी जनतेला स्वस्त दरात अन्नधान्य पुरवण्यात आले आहे. 26 कोटी फेरीवाल्यांकडून कर्जासाठी अर्ज करण्यात आला आहे. 

तसेच प्रधानमंत्री किसान क्रेडीट कार्ड या योजनेअंतर्गत आतापर्यंत 183.14 लाख अर्ज दाखल झाले आहेत. NABARD अंतर्गत अतिरिक्त आपत्कालीन कार्यकारी भांडवल निधीतून रब्बीच्या हंगामासाठी 25,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केले गेले आहेत. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अडीच कोटी शेतकऱ्यांना पत प्रोत्साहन देण्यात आले आहे, 1.4 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटण्यात आले आहेत.

हेही वाचा - Bihar Election: 'हा काही शेवट नाही', पराभवानंतर शत्रुघ्नपुत्र लव सिन्हांची प्रतिक्रिया
त्यांनी म्हटलं की, बाजारपेठा विक्रमी पातळीवर असून भारताची परकीय चलन साठा 560 अब्ज डॉलर आहे. भारताने आर्थिकदृष्ट्या जोरदार पुनरागमन केले आहे. आरबीआयने म्हटले आहे की लवकरच तिसऱ्या तिमाहीत भारत अधिक चांगले काम करेल. आधी चौथ्या तिमाहीत पुनरागमन करेल असं म्हटलं  होतं. NBFC आणि HFC साठी Special Liquidity Scheme या योजनेंतर्गत 7,227 कोटी रुपये वितरित केले गेले आहेत. 12 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आलेल्या SBI च्या योजनेंतर्गत एसबीआय उत्सव कार्डांचे वितरण करण्यात आले आहे. भांडवली खर्चासाठी व्याजमुक्त कर्ज म्हणून 11 राज्यांनी 3,621 कोटी रुपये मंजूर केले. 1,32,800 कोटी रुपये आयकर परतावा म्हणून 39.7 लाख करदात्यांकडे गेले आहेत, असंही त्यांनी नमदू केलं.

 

 

Update:

- बाजारपेठा विक्रमी पातळीवर असून भारताची परकीय चलन साठा 560 अब्ज डॉलर आहे. भारताने आर्थिकदृष्ट्या जोरदार पुनरागमन केले आहे. आरबीआयने म्हटले आहे की लवकरच तिसऱ्या तिमाहीत भारत अधिक चांगले काम करेल. आधी चौथ्या तिमाहीत पुनरागमन करेल असं म्हटलं  होतं. NBFC आणि HFC साठी Special Liquidity Scheme या योजनेंतर्गत 7,227 कोटी रुपये वितरित केले गेले आहेत. 

 

- प्रधानमंत्री किसान क्रेडीट कार्ड या योजनेअंतर्गत आतापर्यंत 183.14 लाख अर्ज दाखल झाले आहेत. NABARD अंतर्गत अतिरिक्त आपत्कालीन कार्यकारी भांडवल निधीतून रब्बीच्या हंगामासाठी 25,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केले गेले आहेत. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अडीच कोटी शेतकऱ्यांना पत प्रोत्साहन देण्यात आले आहे, 1.4 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटण्यात आले आहेत

- आत्मनिर्भर भारत 0.1 मधल्या घोषणांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. वन नेशन वन, रेशन कार्ड योजने अंतर्गत 28 राज्यांमधील  68.8 कोटी जनतेला स्वस्त दरात अन्नधान्य पुरवण्यात आले आहे. 26 कोटी फेरीवाल्यांकडून कर्जासाठी अर्ज करण्यात आला आहे. 
 

- अर्थव्यवस्थेची अवस्था खुप सुधारली आहे. कोरोना व्हायरसचे ऍक्टीव्ह रुग्णदेखील कमी झाले आहेत. ते 10 लाखावरुन घटून 4.89 लाख झाले आहेत. कोरोना व्हायरसचा मृत्यूदर घटूव 1.47 टक्के झाला आहे. 

-  भारतात मागे केलल्या काही उपाययोजनांमुळे आपली अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर सावरत आहे. देशात रेकॉर्डब्रेक अशा जीएसटीचा परतावा झाला आहे. देशी तसेच परदेशी गुंतवणुकीतही मोठी वाढ झाली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FM Nirmala Sitharaman Live Update press conference likely to announcethe package