अर्थमंत्र्यांनी खेचले 'इन्फोसिस'चे कान; म्हणाल्या, 'आशा आहे तुम्ही...

अर्थमंत्र्यांनी खेचले 'इन्फोसिस'चे कान; म्हणाल्या, 'आशा आहे तुम्ही...

नवी दिल्ली : आयकर विभागाची कर भरण्यासाठीची मुख्य वेबसाईट तब्बल सहा दिवस बंद ठेवण्यात आली होती. ग्राहकांना कसल्याही तसदीशिवाय कर भरता यावा यासाठी आता नवीनच वेबसाईट आणली जाईल, अशी घोषणा देखील आयकर विभागाकडू करण्यात आली होती. या नव्या वेबसाईटचं नाव e-filing 2.0 असं असून काल सोमवारी रात्री ही नवी वेबसाईट लाँच करण्यात आली आहे. मोठ्या धुमधडाक्यात आणली गेलेली ही वेबसाईट आता तरी कसल्याही अडचणींशिवाय ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करेल, अशी आशा होती. मात्र, त्याबाबत काही वेळातच लोकांकडून तक्रारीचे सूर उमटू लागले. ही नवी वेबसाईट क्रॅश होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येऊ लागल्या. याचे अनेक स्क्रीनशॉट्स तसेच ट्विट्स देखील पडू लागले. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या वेबसाईटवर काम करणाऱ्या इन्फोसिसला चांगलंच सुनावलं आहे. थेट ट्विटरच्या माध्यमातूनच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी याबाबतची सूचना इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांना दिल्याचं आज मंगळवारी सकाळी पहायला मिळालं. निर्मला सीतारमण यांनी एका ग्राहकाच्या तक्रारीच्या ट्विटवर ही प्रतिक्रिया देताना इन्फोसिसची एकप्रकारे कानउघाडणी केलीआहे.

अर्थमंत्र्यांनी खेचले 'इन्फोसिस'चे कान; म्हणाल्या, 'आशा आहे तुम्ही...
हे आणि काय? पाकिस्तानात चक्क सिक्योरिटी गार्डने केली महिलेची सर्जरी
अर्थमंत्र्यांनी खेचले 'इन्फोसिस'चे कान; म्हणाल्या, 'आशा आहे तुम्ही...
ऑक्सिजन मॉकड्रिल प्रकरण; व्हायरल व्हिडिओनंतर रुग्णालयाला टाळे

काय म्हटलंय अर्थमंत्र्यांनी?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अप्रत्यक्षपणे इन्फोसिस कंपनी आणि नंदन निलेकणी यांना ही समज दिली आहे. अर्थमंत्र्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय की, बहुप्रतिक्षित असणारी e-filing portal 2.0 ही वेबसाईट काल सोमवारी रात्री पावणेनऊ वाजता लाईव्ह करण्यात आली. मात्र, या वेबसाईटबाबत अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत आहेत. माझी अशी अपेक्षा आहे की, इन्फोसिस कंपनी आणि नंदन निलेकणी आपल्या करदात्यांना दिल्या जाणाऱ्या या सुविधेमध्ये कसलाही अपेक्षाभंग करणार नाहीत. कर भरणाऱ्यांसाठी ही कर भरण्याची प्रक्रिया अधिक सहज-सुलभ व्हावी, हेच आपलं प्राधान्य असायला हवं, अशाप्रकारचं ट्विट त्यांंनी केलं आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये त्यांनी इन्फोसिस आणि नंदन निलेकणी यांना थेट टॅग केलं आहे.

नव्या वेबसाईटची जंगी घोषणा
काल सोमवारी ही वेबसाईट सुरु करण्यात आली. ती सुरु झाल्यानंतर स्वत: निर्मला सीतारमण यांनीच ट्विट करत लोकांना याची माहिती दिली होती. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, बहुप्रतिक्षित अशी e-filing portal 2.0 वेबसाईट रात्री पावणेनऊ वाजता सुरु झाली आहे. करदात्यांना कर भरण्यासाठीची प्रक्रिया सहज-सुलभ व्हावी यासाठीच्या व्यवस्थेमधला हा मैलाचा दगड ठरला आहे. ही वेबसाईट देशवासीयांच्या सेवेसाठी आहे. असं ट्विट केलं होतं. मात्र, त्यानंतर काही तासांतच तक्रारींचा सूर वाढू लागल्यानंतर निर्मला सीतारमण यांना थेट इन्फोसिसला सुनवावं लागलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com