लालू भैया और सात साल जेल मा...

वृत्तसंस्था
शनिवार, 24 मार्च 2018

चारा गैरव्यवहार आणि लालूंची शिक्षा 
कोठून पैसे काढले : किती? : शिक्षा 

चैबासा ट्रेझरी : 37.7 कोटी : पाच वर्षे तुरुंगवास 
देवगड ट्रेझरी : 89.27 लाख : साडेतीन वर्षे तुरुंगवास 
चैबासा ट्रेझरी : 37.62 कोटी : पाच वर्षे तुरुंगवास 
डुमका ट्रेझरी : 3.13 कोटी : सात वर्षे तुरुंगवास

रांची : पशुखाद्य गैरव्यवहारातील चौथ्या प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना 'सीबीआय'च्या विशेष न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच 30 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

दोन दशकांपूर्वी डुमकाच्या कोशागारातून 3.76 कोटी रुपये काढल्याचा आरोप लालूप्रसाद व अन्य 18 जणांवर आहे. या खटल्यात (खटला क्रमांक आरसी 38 ए/96) त्यांना दोषी ठरविण्यात आले होते. 'सीबीआय'च्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शिवपालसिंह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे निकाल देऊन शिक्षेचे स्वरूप जाहीर केले. 

'अब तो आदत सी है मुझ को ऐसे जीने में' हे "कलयुग' सिनेमातील गाणे लालूप्रसाद यादव यांनी गुणगुणायला सुरवात करावी, अशी परिस्थिती सोमवारी आली. लालूप्रसादांना एक- दोन नव्हे; तर चौथ्या चारा गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे येत्या काळात तुरुंगाच्या गोठ्यातच लालूंना दिवस काढावे लागले, तर आश्‍चर्य वाटू नये. 

1990च्या दशकात डुमका ट्रेझरीमधून गैरमार्गाने 3.13 कोटी रुपये काढल्याप्रकरणी न्यायाधीशांनी लालू आणि इतर 17 जणांना दोषी ठरविले, तर मिश्रा आणि इतर 11 जणांची आरोपातून मुक्तता केली. दोषी व्यक्तींना गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, बनावट सह्या करणे, बनावट कागदपत्रांचा वापर करणे आणि भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांतर्गत दोषी ठरविण्यात आले होते. आज त्यावर शिक्षा सुनाविण्यात आली.

चारा गैरव्यवहार आणि लालूंची शिक्षा 
कोठून पैसे काढले : किती? : शिक्षा 

चैबासा ट्रेझरी : 37.7 कोटी : पाच वर्षे तुरुंगवास 
देवगड ट्रेझरी : 89.27 लाख : साडेतीन वर्षे तुरुंगवास 
चैबासा ट्रेझरी : 37.62 कोटी : पाच वर्षे तुरुंगवास 
डुमका ट्रेझरी : 3.13 कोटी : सात वर्षे तुरुंगवास

Web Title: Fodder scam case Lalu Prasad Yadav sentenced to 7 yrs in prison