संगीत मैफल सुरु होण्यापूर्वी गायकाने केले फायरिंग!

वृत्तसंस्था
शनिवार, 29 एप्रिल 2017

पोरबंदर (गुजरात) : विवाह समारंभात वराच्या मिरवणुकीदरम्यान फायरिंग केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र संगीत मैफल सुरू करण्यापूर्वी गायकाने फायरिंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोरबंदर (गुजरात) : विवाह समारंभात वराच्या मिरवणुकीदरम्यान फायरिंग केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र संगीत मैफल सुरू करण्यापूर्वी गायकाने फायरिंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अहिंसेचे तत्त्व जपणाऱ्या महात्मा गांधी यांच्या जन्मगावी पोरबंदर येथेच ही घटना घडली आहे. "एएनआय'ने या घटनेचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामध्ये संगीत मैफल सुरू असून गायक आणि काही वादक व्यासपीठावर असल्याचे दिसत आहे. दरम्यान मैफल सुरू करण्यापूर्वी एका व्यक्तीने गोळ्या भरलेली रायफल गायकाच्या हातात दिली. त्यानंतर गायकाने आणि त्याच्या शेजारी बसलेल्या एका वादकाने प्रत्येकी दोन दोन गोळ्या हवेत सोडल्या. हवेत गोळ्या सोडण्याची परंपरा असल्याप्रमाणे या दोघांनीही अगदी सहजपणे हवेत गोळीबार केला.

विशेष म्हणजे संगीत मैफल असल्याने समोर मोठा रसिकवर्ग तेथे उपस्थित होता. अशा वेळी एखादी छोटी चूक झाली असती तर जिवीतहानी होण्याची भीती होती. अशा घटनेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: a folk singer opens fire in the air during a musical event in gujarats porbandar