फोंडा पालिका निवडणूक ; दुपारपर्यंत 55 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

फोंडा पालिकेच्या पंधरा प्रभागांसाठी आज सकाळी मतदान सुरू होऊन दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे 55 टक्के मतदान झाले. सर्व मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या अाहेत. ही निवडणूक भाजप, मगो व काँग्रेस समर्थक गटामध्ये होत असून उमेदवारांमध्ये चुरस आहे.

पणजी : फोंडा पालिकेच्या पंधरा प्रभागांसाठी आज सकाळी मतदान सुरू होऊन दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे 55 टक्के मतदान झाले. सर्व मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या अाहेत. ही निवडणूक भाजप, मगो व काँग्रेस समर्थक गटामध्ये होत असून उमेदवारांमध्ये चुरस आहे.

मागील निवडणुकीत मगो व भाजप समर्थक गटाचे पॅनल होते. मात्र, मगो समर्थक नगरसेवक भाजप समर्थक गटाला जाऊन मिळाल्याने यावेळी मगोचे मंत्री सुदीन ढवळीकर यांनी स्वतंत्र गट निवडणुकीत उतरविला आहे. आज सकाळच्या सत्रात प्रभाग 11 च्या मतदान केंद्रावर आमदार रवी नाईक व मगो गटाचे केतन भाटीकर यांच्यात बाचाबाची झाली होती. मात्र, पोलिस तक्रार झाली नाही. आज मतदान झाल्यानंतर मतमोजणी 7 मे रोजी होणार आहे.

Web Title: Fonda Corporation Election 55 Percent Voting Done