दिल्लीत आजपासून खाद्य महोत्सव

पीटीआय
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - टुना तटाकी पिझ्झा', "सुशी रोल्स', चिकन कस्तु करी, "पिनट बटर कॉफी' असे "हटके' नावांच्या पदार्थांची चव चाखण्याची संधी दिल्लीकरांना शुक्रवारपासून (ता. 21) मिळणार आहे. "एशियन हॉकर्स मार्केट' (एएचएम) या महोत्सवात लज्जतदार पदार्थ उपलब्ध होणार आहेत.

वर्षभरातील हा तिसरा खाद्य महोत्सव असून, उद्यापासून "सिलेक्‍ट सिटीवॉक' मॉलमध्ये याची सुरवात होणार आहे. हॉटेल व्यवसायातील नामवंत "ब्रॅंड'बरोबरच नव्याने सुरू झालेले उद्योगही यात सहभाग घेणार असल्याने विविध चवीच्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी खवय्यांना मिळणार आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार पदार्थ मर्यादित प्रमाणातही मिळणार असून, त्यांच्या किमतीही सर्वांना परवडू शकतील अशा असतील. "पदार्थांची मर्यादित संख्या, मर्यादित प्रमाण, कमी किंमत आणि पदार्थ तयार करताना घेतलेली काळजी, या चार गोष्टींचा आमच्या यशात मोठा वाटा आहे. गेल्या वेळच्या महोत्सवाला 55 हजार नागरिकांनी भेट दिली होती, असे "एएचएम'चे सह व्यवस्थापक अतुल सिकंद यांनी सांगितले.

Web Title: food mahotsav in delhi

टॅग्स