पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यांची फाइल माहिती आयोगाने मागितली

वृत्तसंस्था
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - सुरक्षिततेच्या कारणास्तव विदेश मंत्रालयाने पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यांसंदर्भातील माहिती देण्याचे नाकारल्याने याबाबतच्या माहितीची फाइल आता केंद्रीय माहिती आयोगाने मागितली आहे. निवृत्त नौदल अधिकारी लोकेश बत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यांबाबत माहिती मागितली होती; मात्र विदेश मंत्रालयाने सुरक्षिततेचे कारण देत ती देण्यास नकार दिला होता.

सुरक्षिततेच्या कारणांची खातरजमा करण्यासाठी पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यांबाबतची फाइल द्यावी, अशा सूचना मुख्य माहिती अधिकारी राधाकृष्ण माथूर यांनी विदेश मंत्रालयाला दिल्या आहेत. या दौऱ्यांची माहिती सादर करण्याआधी ती न देण्यात खरेच काही सुरक्षिततेचे कारण आहे काय, याची खातरजमा माहिती आयोग करेल, असे माथूर म्हणाल्या.

या दौऱ्याच्यानिमित्ताने एअर इंडियाला कोट्यवधी रुपये दिले जातात. वास्तविक ते जनतेकडून कराच्या रूपाने आकारले जातात, असे बात्रा यांनी आयोगासमोर सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी 15 जून 2014 ते 8 सप्टेंबर 2016 दरम्यान केलेल्या विदेश दौऱ्यांचे बिल अद्यापही अदा करण्याच्या प्रक्रियेत आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर 13 सप्टेंबर 2016 रोजी दाखविण्यात येत होती, असे बात्रा यांनी आयोगाला सांगितले. एअर इंडियाला बिल देण्यात झालेल्या विलंबाची कारणे समजून यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

Web Title: Foreign trip information sought by information commission