वन विभागाने पकडले बिबट्याला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

दोन महिलांवर हल्ला करून बिबट्याने त्यांना ठार केले होते.

अलवर (राजस्थान) : अलवर जिल्ह्यात नुकत्याच दोन महिलांवर हल्ला करणाऱ्या दोन बिबट्यांना वन विभागाला पकडण्यात यश आले आहे.

अलवर जिल्ह्यात चार पिंजरे लावण्यात आले होते. त्यापैकी रामपूर येथे एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला, तर अन्य एक बिबट्या हा जखमी अवस्थेत सापडला, असे मुख्य वनाधिकारी आर. एस. शेखावत यांनी सांगितले.

या दोन्ही बिबट्यांना जयपूर येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, दोन महिलांवर हल्ला करून बिबट्याने त्यांना ठार केले होते. शांतीबाई (वय 55) आणि बिरडीबाई (वय 45) असे ठार झालेल्या महिलांची नावे आहेत.

Web Title: forest dept caught big cat in alwar