'फॉर्मेलिन' हे विरोधकांचे नाटक : मनोहर पर्रीकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

परराज्यातून मासळी घेऊन आलेले काल सात व आज एक ट्रक गोव्याच्या हद्दीवरूनच परत पाठवण्यात आले. फॉर्मेलिनच्या मुद्यावर येत्या सोमवारी (23 जुलैला) उत्तर दिले जाणार आहे. या प्रकरणाचा अन्न व औषध प्रशासन तसेच मत्स्य खात्याशी संबंध येतो तसेच पोलिस खाते कारवाईस जबाबदार असतात.

पणजी : विरोधकांना विधानसभा सभागृह कामकाज नियम माहीत नाहीत. त्यांनी स्थगन प्रस्तावावर चर्चा घेण्याची मागणी करताना प्रश्‍नोत्तराचा तास स्थगित करण्याचे म्हटलेले नाही. आज त्यांचा स्थगन प्रस्ताव नव्हता. कालचा प्रस्ताव आज घेण्याचे विधानसभा 
कामकाजाच्या नियमात बसत नाही. विरोधक सभागृहाच्या कामकाजात अडथळे आणून ते चालू नये म्हणून त्यांचे हे नाटक आहे. 

परराज्यातून मासळी घेऊन आलेले काल सात व आज एक ट्रक गोव्याच्या हद्दीवरूनच परत पाठवण्यात आले. फॉर्मेलिनच्या मुद्यावर येत्या सोमवारी (23 जुलैला) उत्तर दिले जाणार आहे. या प्रकरणाचा अन्न व औषध प्रशासन तसेच मत्स्य खात्याशी संबंध येतो तसेच पोलिस खाते कारवाईस जबाबदार असतात. राज्यातील मासळीची आयात बंद करण्यात आली आहे. त्यामुळे फॉर्मेलिनप्रकरणीचा मुद्दा तातडीने चर्चेस घेण्याची आवश्‍यकता वाटत नाही.

सभापतींनी विरोधकांची लक्षवेधी सूचना स्वीकारली होती व त्यावर काल प्रश्‍नोत्तर तासानंतर चर्चा घेण्यास तयारी दाखविली होती तरी विरोधकानी अडथळे आणून सभागृहाचे कामकाज रोखले. प्रत्येक दिवशी विधानसभेतील कामकाज वेगळे असते, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Web Title: Formalin is Oppositions Drama says Manohar Parrikar