'माझ्यासह 'आप'च्या 52 महिलांवर अत्याचार'

वृत्तसंस्था
बुधवार, 7 सप्टेंबर 2016

चंदिगड - माझ्यासह पक्षातील 52 महिला नेत्या आणि कार्यकर्त्यांवर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोप आम आदमी पक्षाच्या फिरोजपूर जिल्ह्यातील माजी समन्वयक आणि राज्य समितीच्या सदस्य अमनदीप कौर यांनी केला आहे. 

अमनदीप कौर यांनी पक्षातीलच नेत्यांवर आरोप केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे. दरम्यान पंजाबच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा परमजीत कौर यांनी पंजाब पोलिसांना पत्राद्वारे आम आदमी पक्षातील नेत्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. वृत्तपत्रे आणि इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांमध्ये वारंवार समोर येत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरण गांभीर्याने घेत परमजीत कौर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पंजाबमधील तिकिट वाटप करताना महिलांवर लैंगिक अत्याचार केले असून अन्य प्रकारेही त्रास दिला असल्याचेही परमजीत कौर यांनी पत्रात म्हटले आहे. आम आदमी पक्षातील निलंबित नेते संदीप कुमार यांच्यासंदर्भातील अश्‍लील सीडी समोर आल्यानंतर आणखी काही नेत्यांचे प्रकरणे बाहेर येत आहेत.

Web Title: Former AAP women leader claims sexual harassment within Party