Loksabha 2019 ः भाजपला मिळणार ताकद; माजी खासदाराचा पक्षप्रवेश

Loksabha 2019 ः भाजपला मिळणार ताकद; माजी खासदाराचा पक्षप्रवेश

नवी दिल्ली- ओडिशामध्ये भाजपला मोठी ताकद मिळण्याची चिन्हे असून बिजू जनता दलाचे माजी खासदार बैजयंत जय पांडा यांनी आज सोमवार (ता. 04) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. ओडिशामध्ये भाजपची तशी फारशी ताकद नाही पण बैजयंत जय पांडा यांच्या पक्षप्रवेशाने ओडिशामध्ये भाजपला ताकद मिळू शकते. 

बैजयंत जय पांडा हे बिजू जनता दलाचे नेते होते. भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यानंतर केंद्रिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. 

तत्पूर्वी, त्यांनी 28 मे 2018ला बिजू जनता दलाचा राजीनामा दिला होता. गेल्या 20 वर्षापासून ते राज्यसभा किंवा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता भारतीय जनता पक्षाला ओडिशामध्ये बैजयंत जय पांडा यांच्या पक्षप्रवेशाचा फायदा होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com