भाजपला धक्का, भाजपच्या संस्थापकाचा मुलगाच काँग्रेसमध्ये

वृत्तसंस्था
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

पश्‍चिम राजस्थानमधील राजपूत समाजावर विशेष प्रभाव असलेल्या मानवेंद्रसिंह यांनी गेल्या शनिवारी पक्षाचा राजीनामा दिला होता. आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  

जयपूर : विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या राजस्थानमध्ये सत्तारूढ भाजपचा मार्ग खडतर होताना दिसत आहे. कारण, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे संस्थापक जसवंतसिंह यांचे चिरंजीव आणि शेओ मतदारसंघाचे आमदार मानवेंद्रसिंह यांनी आज (बुधवार) काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पश्‍चिम राजस्थानमधील राजपूत समाजावर विशेष प्रभाव असलेल्या मानवेंद्रसिंह यांनी गेल्या शनिवारी पक्षाचा राजीनामा दिला होता. आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  

भाजपला सोडचिठ्ठी दिलेले आमदार मानवेंद्रसिंह हे भाजपचे संस्थापक व ज्येष्ठ नेते जसवंतसिंह यांचे ते पुत्र आहेत. मानवेंद्रसिंह यांनी 2013 मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदारकी मिळविली होती. मानवेंद्रसिंह यांच्या कॉंग्रेसप्रवेशामुळे या पक्षाला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजपुतांची मते मिळण्याची दाट शक्‍यता आहे.

Web Title: former BJP leader Manvendra Singh joins to Congress