उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे निधन

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे निधन

नवी दिल्ली : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचे आज (गुरुवार) वयाच्या 93 व्या वर्षी उपचारांदरम्यान निधन झाले. दिल्लीतील साकेत येथील मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात होते. त्यानंतर आज अखेर त्यांचे निधन झाले.

एन. डी. तिवारी यांनी राजकीय जीवनात विविध पदे भूषविली होती. त्यांनी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा तीनवेळा तर उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा एकदा पदभार स्वीकारला होता. याशिवाय त्यांनी राज्यपालपदही उपभोगले होते. तसेच राजीव गांधी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थ आणि परराष्ट्रमंत्री म्हणूनही पदभार स्वीकारला होता. 1976 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी ते एक होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा आहे. 

दरम्यान, एन. डी. तिवारी यांचा आज जन्मदिवस होता. मात्र, जन्मदिनीच त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून शोक व्यक्त केला जात आहे. 

पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे एकमेव मुख्यमंत्री

एन. डी. तिवारी झारखंड सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पूर्ण करणारे ते एकमेव मुख्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये प्रवेशापूर्वी त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतही मोठे योगदान दिले होते. 

पंतप्रधानपदाचीही लढवली निवडणूक

एन. डी. तिवारी यांनी 1990 मध्ये पंतप्रधानपदासाठीची निवडणूकही लढविली होती. मात्र, अवघ्या 800 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधानपदी विराजमान झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com