शेवटच्या क्षणी पक्षानं तिकीट कापलं; आप नेत्याचा थेट टॉवरवर चढत हाय-व्होल्टेज ड्रामा, पोलिसांची पळापळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Municipal Corporation Election 2022

'आप'च्या नेत्यांनी माझी फसवणूक केलीय. शेवटच्या क्षणी माझं तिकीट कापण्यात आलं.

शेवटच्या क्षणी पक्षानं तिकीट कापलं; आप नेत्याचा थेट टॉवरवर चढत हाय-व्होल्टेज ड्रामा, पोलिसांची पळापळ

नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत (Delhi Municipal Corporation Election) पक्षाकडून तिकीट न मिळालेल्या कार्यकर्त्यांची नाराजी आता उघडपणे समोर येत आहे. आज (रविवार) आम आदमी पक्षाकडून (Aam Aadmi Party) तिकीट न मिळाल्यामुळं संतप्त माजी नगरसेवकानं लाईटच्या टॉवरवर चढत आपला रोष व्यक्त केला.

हसीब उल हसननं (Haseeb ul Hasan) आप नेत्यांवर गंभीर आरोप केलेत. हसन म्हणाला, 'आप'च्या नेत्यांनी माझी फसवणूक केलीय. शेवटच्या क्षणी माझं तिकीट कापण्यात आलं. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा: Tipu Sultan : टिपू सुलतानचा पुतळा का बसवायचा नाही? काँग्रेसच्या बड्या नेत्यानं भाजपला चांगलंच सुनावलं

'आप'चे माजी नगरसेवक हसीब उल हसन शास्त्री पार्क मेट्रो स्टेशनजवळील ट्रान्समिशन टॉवरवर चढत असल्याच्या माहितीवरून स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. माहिती मिळताच, पोलीस आणि अग्निशमन दलाचं पथकही घटनास्थळी पोहोचलं आहे.

हेही वाचा: सर्वजण आता जास्त शहाणे झालेत, देवानं त्यांना रातोरात अक्कल दिलीय; पटेलांचा बावनकुळेंवर घणाघात

'आप'कडून 117 उमेदवारांची यादी जाहीर

एमसीडी निवडणुकीसाठी 'आप'नं शनिवारी संध्याकाळी उशिरा आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. एमसीडी निवडणुकीसाठी उमेदवारांच्या दुसऱ्या आणि अंतिम यादीत सर्वेक्षणात समोर आलेल्या पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना आपनं स्थान दिलंय. 'आप'नं शनिवारी 117 उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. यात संघटनेशी संबंधित बहुतांश कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

हेही वाचा: गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?