माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे निधन 

टीम ई-सकाळ
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

चेन्नई : नियमांची काटेकोर अंमलबजावणी करीत निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणणारे आणि गैरप्रकार करणाऱ्यांच्या मनात धडकी भरविणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त तिरुनेल्लाई नारायणा ऊर्फ टी. एन. शेषन (वय 87) यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. 

शिवमहाआघाडीसाठी शिवसेनेची तयारी; सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण

शेषन यांचा जन्म 15 डिसेंबर 1932 ला केरळमधील पलक्कड येथे झाला होता. भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1955 च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या टी. एन. शेषन यांनी डिसेंबर 1990 ते डिसेंबर 1996 या कालावधीत देशाचे दहावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिले. त्यांनी कॅबिनेट सचिव म्हणूनही काम पाहिले होते. निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती होण्याआधी ते योजना आयोगाचे सदस्य होते. शेषन हे निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी यंत्रणेला लावलेल्या शिस्तीमुळे सामान्य जनतेमध्येही लोकप्रिय झाले होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी निवडणूक प्रक्रियेत सुधारणा केली आणि आयोगाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. सेवेतील त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल 1996 मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त झाला होता. भारत सरकारनेही पद्मश्री आणि पद्मविभूषणने सन्मानित केले होते. 

बहुमताची गोळाबेरीज संजय राऊतच करणार; रात्रीच जाणार दिल्लीला

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former election commissioner t n seshan passes away