esakal | लोकशाहीचे पाईक अरुण जेटली
sakal

बोलून बातमी शोधा

Arun Jaitley

जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थी आणि युवकांचे देशव्यापी संघटन बांधले त्याचे ते संयोजक होते. सतीश झा आणि स्मितू कोठारी यांच्या जोडीने जेटली "पीपल्स युनियन फॉर सिव्हील लिबर्टीज'चे (पीयूसीएल) बातमीपत्र प्रसिद्ध करायचे. तुरूंगातून बाहेर पडल्यावर जेटलींनी जनसंघात प्रवेश केला.

लोकशाहीचे पाईक अरुण जेटली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली (वय 67) यांचे आज आजारपणाने निधन झाले. विद्यार्थी ते विधीज्ञ असा प्रवास करणारे जेटली हे लोकशाहीचे पाईक होते.

सत्तरच्या दशकात जेटली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते होते. याच संघटनेतर्फे ते दिल्ली विद्यापिठाच्या विद्यार्थी संघटनेचे प्रमुख बनले. आणिबाणीच्या काळात नागरी हक्क स्थगित केले तेव्हा जेटलींना "मिसा'खाली 19 महिने तुरुंगात डांबले. 1973 मध्ये जयप्रकाश नारायण आणि राजनारायण यांनी सुरू केलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात जेटलींनी उडी घेऊन नेतृत्वही केले.

जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थी आणि युवकांचे देशव्यापी संघटन बांधले त्याचे ते संयोजक होते. सतीश झा आणि स्मितू कोठारी यांच्या जोडीने जेटली "पीपल्स युनियन फॉर सिव्हील लिबर्टीज'चे (पीयूसीएल) बातमीपत्र प्रसिद्ध करायचे. तुरूंगातून बाहेर पडल्यावर जेटलींनी जनसंघात प्रवेश केला. 1977 मध्ये ते लोकतांत्रिक युवा मोर्चाचे समन्वयक होते. त्याकाळात काँग्रेसला पराभवाच्या नामुष्कीला तोंड द्यावे. याच दरम्यान जेटली "अभाविप'चे दिल्लीचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय सचिव झाले. 1980 मध्ये त्यांना भाजपच्या दिल्ली शाखेचे सचिव आणि युवा विभागाचे अध्यक्ष करण्यात आले. 

- 1977 पासून जेटली सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयात वकिली करत होते. जानेवारी 1990 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना ज्येष्ठ वकिल केले. विश्‍वनाथ प्रतापसिंग यांच्या सरकारने जेटलींना अतिरिक्त महाभिवक्ता केले. त्यांनी बोफोर्स प्रकरणाच्या तपासाची दिशा निश्‍चित केली, त्यासाठी कागदोपत्री तयारी केली. जनता दलाचे शरद यादव, कॉंग्रेसचे माधवराव शिंदे यांच्यापासून ते भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी त्यांचे आशिल होते. जेटलींचे कायद्यावरील लेखन प्रसिद्ध आहे. भ्रष्टाचाराविरोधात त्यांचे कार्य आहे, त्यांनी इंडो-ब्रिटीश लिगल फोरमसमोर निबंध सादर केलेत. जून 1998 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात अंमली पदार्थ आणि भ्रष्टाचारविरोधी कायद्याबाबत कामकाज सुरू होते, तेव्हा त्यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून काम केले. 

- कोका कोलाविरुद्ध पेप्सी कंपनी या देशातील विविध दाव्यांमध्ये जेटली हे "पेप्सी'चे वकिल होते. 2002 मध्ये मनाली-रोहतांग रस्त्यावरील खडकांवर जाहिराती केल्याबद्दल "पेप्सी'ला दंड झाला, त्यावेळी जेटलींनी "पेप्सी'ची वकिली केली. 2004 मध्ये जेटलींनी राजस्थान उच्च न्यायालयात "कोका कोला'ची वकिली केली. जेटलींनी जून 2009 पासून वकिलीचे कामकाज थांबवले. 

loading image
go to top