गुजरातमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला धक्का; माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादीत

गुजरातमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला धक्का; माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादीत

अहमदाबाद- गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यापूर्वी काँग्रेस आणि भाजपमध्ये राहिलेल्या वाघेला यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपली नवी इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला.

गेल्या आठवडाभरापासून वाघेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अहमदाबादमध्ये वाघेला यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शरद पवारांसोबत झालेल्या चर्चेनंतरच राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं वाघेला यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, शंकरसिंह वाघेला हे काही काळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचेही नेते राहिले आहेत. गुजरात राज्याचे ते माजी मुख्यमंत्री होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व भारतीय जनता पक्षाचे माजी सदस्य असलेल्या वाघेलांनी 1998 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते 6 व्या, 9 व्या, 13 व्या व 14व्या लोकसभेचे तर 1984 ते 1989 दरम्यान राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये वाघेला साबरकांठा मतदारसंघामधून उभे राहिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com