शाह फैझल यांचा काश्मिरमध्ये नवा 'पीपल्स मूव्हमेंट' पक्ष

वृत्तसंस्था
सोमवार, 18 मार्च 2019

श्रीनगर - माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांच्या राजकीय प्रवासाला आजपासून सुरवात झाली, "जम्मू-काश्‍मीर पीपल्स मूव्हमेंट' या नव्या पक्षाला आज त्यांनी प्रारंभ केला.

यानिमित्त श्रीनगरमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सभेला "जेएनयू'च्या विद्यार्थी नेत्या शेहला रशिद यादेखील उपस्थित होत्या. या वेळी बोलताना फैझल म्हणाले, ""सुरवातीस मला काश्‍मीर खोऱ्यातील कोणत्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश करावा, असे वाटत होते. पण, लोकांच्या मनात सर्वच पक्षांप्रती नकारात्मक भावना आहे. यामुळेच मी नवा राजकीय पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. काश्‍मीर खोऱ्यातील तरुणांसाठी हे नवे व्यासपीठ आहे. 

काश्‍मीर समस्येबाबत शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी आपला पक्ष प्रयत्न करेल. धर्माच्या आधारावर राज्याचे विभाजन करू पाहणाऱ्या पक्षांविरोधात आमची लढाई आहे. आम्ही तरुणांसाठी काम करू, आरोग्य क्षेत्रात सुधारणा घडवून आणू, राज्यातील भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याचा निर्धार आम्ही करत आहोत. जी मंडळी मला त्यांच्या राजकीय पक्षात आणू पाहत होती; तेच लोक आज मला संघ आणि भाजपचा एजंट ठरवू पाहत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या दोघांचाही आपल्यावर खूप प्रभाव आहे.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former IAS officer Shah Faesal launches his political party Jammu and Kashmir Peoples Movement