इस्त्रोच्या माजी प्रमुखांचा भाजपमध्ये प्रवेश

Madhavan Nair
Madhavan Nair

त्रिवेंद्रम : भारतीय अंतराळ संशोधन विभागाचे (इस्त्रो) माजी प्रमुख माधवन नायर यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

केरळमधील त्रिवेंद्रम येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत नायर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नायर हे इस्त्रोचे प्रमुख आणि त्यापूर्वी सचिवही होते. 

केरळमधील तिरुअनंतपुरम येथील मुळचे असलेले नायर यांनी 1966 मध्ये केरळ विश्वविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी मुंबईतील भाभा अनुसंधान केंद्रात प्रशिक्षण घेतले. इस्त्रोचे प्रमुख म्हणून त्यांनी सहा वर्षे कार्यभार सांभाळला. त्यांच्या काळात इस्त्रोने अनेक उपग्रहांचे यशस्वी उड्डाण केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com