लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी व्हेंटिलेटरवर

वृत्तसंस्था
रविवार, 12 ऑगस्ट 2018

गेल्या काही दिवांसापासून सोमनाथ चटर्जी यांना मूत्रपिंडाचा त्रास सुरू आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

कोलकाता : लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. चॅटर्जी यांची प्रकृती मध्यरात्री आणखीनच खालावली. चॅटर्जी यांना वैद्यकीय उपचारांसाठी 10 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गेल्या काही दिवांसापासून सोमनाथ चटर्जी यांना मूत्रपिंडाचा त्रास सुरू आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. चॅटर्जी यांना यापूर्वी 28 जूनला कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. 

दरम्यान, चॅटर्जी यांनी 1968 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. 1971 मध्ये पहिल्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले होते. तब्बल 10 वेळा त्यांनी खासदारकीची जबाबदारी सांभाळली. 

Web Title: Former Lok Sabha speaker Somnath Chatterjee on ventilator