गोवा - माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो भ्रष्टाचारी, उदय मडकईकर यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

गोवा : पणजी महापालिकेेचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी  गेल्या दोन वर्षात अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचार केल्याने त्यांना महापौरपद गमवावे लागले असा आरोप नगरसेवक उदय मडकईकर यांनी केला.

त्यांच्याविरुद्धचे पुरावे आपण जमा करत असून लवकरच या भ्रष्टाचारप्रकरणाची तक्रार गोवा लोकायुक्तमध्ये दाखल करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. 
पणजीतील बंदर कप्तान कार्यालयाजवळील पदपथावर अतिक्रमण केलेल्या महाराजा व्यवस्थापनाला बेकायदा कार्यालय उभारण्याचा तोंडी परवाना महापौर फुर्तादो यांनीच दिली होता. त्यासाठी त्यांना मोठी रक्कमही स्वीकारली होती. या  कार्यालयाविरोधात काँग्रेसने आंदोलन केले तेव्हा ते त्यामध्ये सामील झाले नाहीत. त्यांच्या या कथित भ्रष्टाचारामुळेच महापालिकेत सत्तेवर असलेल्या गटाचे प्रमुख माजी मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी तिसऱ्यांदा महापौराची संधी न देता त्यांना हटविले, असे मडकईकर म्हणाले.

Web Title: former mayor corrupt said corporator uday madaikar in goa