माजी आमदाराला जन्मठेपेची शिक्षा; महिला, मुलीची केली होती हत्या

Former MLA sentenced to life imprisonment
Former MLA sentenced to life imprisonmentFormer MLA sentenced to life imprisonment

महिला व मुलीच्या हत्येप्रकरणी रायगड जिल्हा न्यायालयाने छत्तीसगडचे बिजू जनता दलाचे (बीजेडी) माजी नेते आणि माजी आमदार अनूप कुमार साई यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्ह्यातील पाचवे अतिरिक्त सत्र न्यायाधीश कमलेश जगदल्ला यांच्या न्यायालयाने साई यांना शिक्षा सुनावल्याचे सरकारी वकील दीपक शर्मा यांनी शनिवारी सांगितले. (Former MLA sentenced to life imprisonment)

७ मे २०१६ रोजी रायगड जिल्ह्यातील हमीरपूर रोडवर महिला आणि मुलीची अज्ञात व्यक्तींनी चिरडून हत्या (Murder) केली होती. कल्पना दास (३२) आणि मुलगी बबली (१४, रा. ब्रजराजनगर, ओडिशा) अशी मृतांची ओळख मार्च २०१७ मध्ये झाली होती. हे प्रकरण प्रेमप्रकरणाचे होते. जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक संतोष सिंह यांच्या नेतृत्वाखाली चक्रधरनगर पोलिसांनी या प्रकरणी माजी आमदार साई आणि चालक वर्धन टोप्पो यांना १३ फेब्रुवारी २०२० रोजी अटक केली होती.

Former MLA sentenced to life imprisonment
ईडीच्या कारवाईविरोधात नवाब मलिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

पोलिसांनी नंतर कोर्टात साई आणि वर्धन विरुद्धच्या खटल्यात हस्तक्षेप केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने साईला कल्पना दास आणि मुलीची हत्या, गुन्हेगारी कट आणि पुरावे दडपल्याप्रकरणी दोषी ठरवले, असे शर्मा यांनी सांगितले. न्यायालयाने साईला जन्मठेप (life imprisonment) आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. न्यायालयाने साईचा ड्रायव्हर वर्धन याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली, असे शर्मा यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com