काँग्रेस माजी खासदार अॅड. शातांराम नाईक यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

मडगाव (गोवा) : माजी खासदार व गोवा प्रदेश काॅंग्रेस समितीचे माजी अध्यक्ष अॅड. शातांराम नाईक यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना घोगळ - मडगाव येथील त्रिमूूतीॅ इस्पितळात दाखल करण्यात आले. तथापि, तिथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल काॅंग्रेससह अन्य राजकीय पक्षांचे नेते तसेच राजकीय नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विटरद्वारे नाईक यांना श्रद्धांजली व्यक्त केली आहे.

त्यांच्या मागे पत्नी बिना व पूत्र अर्चित असा परिवार आहे. त्यांच्या पाथिर्वावर 10 जून रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात असून अंत्ययात्रा अमृतनगर - घोगळ येथील निवासस्थानाहून सकाळी 10.30 वाजता निघणार आहे.

निष्ठावान काॅंग्रेस नेते अशी नाईक यांची प्रतिमा होती. गेली 50 वर्षे ते काॅंग्रेसशी संलग्न होते. 1967 मधील विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेस उमेदवाराचे पोस्टर चिकटणारा तरुण कायकर्ता ते लोकसभा व राज्यसभेचे खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास होता. 1984 मध्ये ते उत्तर गोव्याचे खासदार म्हणून निवडून आले होते. दोनवेळा  गोव्याचे राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांची निवड झाली होती. गोवा प्रदेश काॅंग्रेस समितीचे अध्यक्षपद त्यांनी तीन वेळा भूषवले आहे. काॅंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी तरुणांना संधी द्या या आवाहनास अनुसरून त्यांनी  अलिकडेच गोवा प्रदेश काॅंग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. 

व्यवसायाने वकील असलेले नाईक यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते. दक्षिण गोवा वकील संघटना व राज्य बार असोसिएशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. खासदरकीच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक खाजगी विधेयके संसदेत मांडली. गोव्यास घटक राज्याचा दर्जा मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

Web Title: former mp of congress ad shantaram naik passed away