पाकची पुन्हा नाचक्की; माजी उच्चायुक्तांकडून पॉर्नस्टारचा फोटो शेअर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 September 2019

पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीरचा तरूण म्हणून चक्क एका पॉर्नस्टारचा फोटो रिट्विट केला आहे. त्यामुळे भारतावर टीका करताना पाकिस्तानच्या अधिकाऱ्याचे हासू झाले आहे.  

नवी दिल्ली : कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. अनेक प्रकारांनी भारताला त्रास कसा देता येईल याकडे पाकचे विशेष लक्ष आहे. पण त्यांच्या कुरघोड्या त्यांच्यावरच उलटताना दिसत आहेत. असाच एक डाव पुन्हा पाकवर उलटला आहे.

tweet

पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीरचा तरूण म्हणून चक्क एका पॉर्नस्टारचा फोटो रिट्विट केला आहे. त्यामुळे भारतावर टीका करताना पाकिस्तानच्या अधिकाऱ्याचे हासू झाले आहे.  

जॉनी सीन या पॉर्नस्टार्सचा फोटो असणारी काश्मीरसंदर्भातील एक खोटे ट्विट व्हायरल होत होती. ‘अनंतनागमध्ये दगडफेक झाली असून त्यात पॅलेट गनमुळे युसूफ नावाच्या तरुणाचा डोळा फुटला आहे. सर्वांनी या विरोधात आवाज उठवायला हवा,’ अशा कॅप्शनसहीत हेच ट्विट बासित यांनी रिट्विट केले आहे. आपली चूक लक्षात आल्यानंतर बासित यांनी हे ट्विट डिलीट केले असले तरी अनेकांनी त्याचे स्क्रीनशॉर्ट्स आता व्हायरल केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Pak high commissioner Abdul Basit shares Porn Star Johnny Sins photo as a Kashmiri boy