काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीला मनमोहन सिंग यांनी फिरवली पाठ

दिल्लीत काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडत आहे.
Manmohan Singh
Manmohan Singhesakal

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आज रविवारी (ता.१३) सुरु झाली आहे. यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा (Congress Party) जो दारुण पराभव झाला आहे, त्यावर चर्चा केली जात जाहे. या बैठकीला पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह जी-२३ गटाचे सदस्यही उपस्थित आहेत. मात्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्यासह तीन नेत्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली आहे. (Former PM Manmohan Singh Didn't Attend Congress Working Committee Meeting)

Manmohan Singh
Russia Ukraine War | युक्रेनच्या लष्करी तळावर हल्ला, ३५ जणांचा मृत्यू

कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आल्याने काँग्रेस नेते ए.के अँटनी यांनी बैठकी येऊ शकले नाहीत. बैठकीत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाच्या नावावर चर्चा होत असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com