गोव्यात माजी रणजीपटूचा क्रिकेट खेळतानाच मृत्यू

गोव्यात माजी रणजीपटूचा क्रिकेट खेळतानाच मृत्यू

मडगाव ः गोव्याचा माजी रणजीपटू राजेश घोडगे (44 वर्षे) याला मैदानावर खेळत असताना आलेल्या ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मडगाव क्रिकेट क्लबने क्लबच्या सदस्यांसाठी आयोजित केलेल्या सामन्यात तो खेळत होता. नॉन स्ट्राईकवर असताना त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्याने तो खेळपट्टीवरच कोसळला.

मडगाव क्रिकेट क्लब दरवर्षी आपल्या सदस्यांसाठी एक क्रिकेट स्पर्धा आयोजित करते. या स्पर्धेत क्लबचे आजी माजी खेळाडू सहभागी होतात. आज (ता.13) सामना सूरू असताना राजेश घोडगे याला ह्रदयविकाराचा झटका आला. या संघात खेळाडू म्हणून डॉक्टर्सही होते. त्यांनी राजेशवर उपचार केले. तरीही प्रकृती खालवत असल्याचे जाणवल्याने त्याला जवळच्याच इएसआय रुग्णालयात नेण्यात आले. येथे उपचारानंतर एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर या रुग्णालयात त्याला मृत जाहीर केले.
 

दरम्यान, राजेशने मडगाव क्रिकेट क्लबकडून राज्यस्तरावर अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून प्रतिनिधीत्व केले होते. तडाखेबाज फलंदाज म्हणून तो प्रसिद्ध होता. चार दिवसांपूर्वी गोवा क्रिकेट असोशिएशनच्या स्पर्धेत कुडचडे जिमखानातर्फे खेळताना अर्धशतक झळकावले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com