काश्मीरमध्ये माजी सरपंचाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात एका माजी सरपंचाची आज (सोमवारी) सकाळी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात एका माजी सरपंचाची आज (सोमवारी) सकाळी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली.

पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा येथील माजी सरपंच फैयाज अहमद यांचे दहशतवाद्यांनी आज सकाळी त्यांच्या घरातून अपहरण केले. त्यानंतर छेवा कालन या गावात नेऊन गोळ्या घालून त्यांची हत्या केली.

काश्मिरमध्ये यापूर्वीही दहशतवाद्यांकडुन अशाप्रकारे सरपंचांना लक्ष करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या घटनेच्या चौकशीचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले असून, अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

Web Title: former sarpanch killed in kashmir