कुटुंबातील मृतदेह आढळले फ्रिज, सुटकेस आणि कपाटात...

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

मनोज खुशवाह यांनी प्रथम पत्नीला व नंतर तीन मुलींना मारले व त्यानंतर आत्महत्या केली' असा प्राथमिक अंदाज पोलिस निरीक्षक नितीन तिवारी यांनी व्यक्त केला.

अलाहाबाद : शहरात सोमवारी (ता. 20) एकाच कुटूंबातील पाच जणांचे मृतदेह बंद घरात आढळले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. यात तीन लहान मुलींचा समावेश आहे. या प्रकरणात घरातील पुरूष पंख्याला लटकलेल्या अवस्थेत, त्यांच्या पत्नीचा मृतदेह फ्रिजमध्ये तर दोन लहान मुलींचा मृतदेह सुटकेस व कपाटात आढळला, तर तिसऱ्या मुलीचा मृतदेह हा बाजूच्या खोलीत आढळला. 

या भीषण प्रकारानंतर परिसरात भीतीचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. 'हे घर आतून बंद होते. मनोज खुशवाह यांनी प्रथम पत्नीला व नंतर तीन मुलींना मारले व त्यानंतर आत्महत्या केली' असा प्राथमिक अंदाज पोलिस निरीक्षक नितीन तिवारी यांनी व्यक्त केला.

ही घटना घरातील अंतर्गत वाद व पत्नीवरील संशयावरून घडल्याचा अंदाजही पोलिस व्यक्त करत आहेत.  

Web Title: found 5 members deadbodies from same family in allahabad

टॅग्स