बॅंकेच्या सरव्यवस्थापकासह चौघांना सुरतमध्ये अटक

शुक्रवार, 6 जानेवारी 2017

सुरतमधील गोदोड येथील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत हा प्रकार उघडकीस आला. बॅंक ऑफ इंडियाचे सहायक सरव्यवस्थापक जे. एल. बन्सल, निवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक एन. एल. गमीत यांच्यासह "महर्षी ट्रेडर्स'चे महर्षी चोक्कस, "मंगल गुलाबचंद चोक्‍सी'चे हिमांशू शहा यांना "सीबीआय'ने अटक केली.

सुरत - चलनातून रद्द झालेल्या जुन्या हजार व पाचशेच्या नोटांच्या रूपात 24 कोटी 35 लाख रुपये जनधन खात्यात बेकायदा जमा केल्याच्या आरोपावरून बॅंक ऑफ इंडियाचे सहायक सरव्यवस्थापक व निवृत्त वरिष्ठ व्यवस्थापकांसह चार जणांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली.

सुरतमधील गोदोड येथील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत हा प्रकार उघडकीस आला. बॅंक ऑफ इंडियाचे सहायक सरव्यवस्थापक जे. एल. बन्सल, निवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक एन. एल. गमीत यांच्यासह "महर्षी ट्रेडर्स'चे महर्षी चोक्कस, "मंगल गुलाबचंद चोक्‍सी'चे हिमांशू शहा यांना "सीबीआय'ने अटक केली. या चौघांना अहमदाबादमधील "सीबीआय' न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायालयाचे न्या. पी. जी. गोकाणी यांनी आरोपींना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

आरोपींनी त्यांच्याकडील काळा पैसा नवीन चलनात पांढरा करण्यासाठी जनधन खात्याचा वापर केला. सुनील रूपानी यांच्या "एसआर ट्रेडर्स' नावाने असलेल्या खात्यात या चौघांनी प्रथम 24 कोटी 35 लाख रुपये जमा केले. ही रक्कम "जनधन'सह 226 बचत खात्यांमध्ये हस्तांतरित झाली असल्याचा "सीबीआय'ला संशय असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. सुरत पीपल्स सहकारी बॅंकेच्या पाच अधिकाऱ्यांनाही "सीबीआय'ने या प्रकरणी समन्स दिले आहेत.

Web Title: Four arrested in Surat