ओझं म्हणून जगण्यापेक्षा मेलेलं केव्हांही बर...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

जयपूरः राजस्थानमध्ये बेरोजगारीला कंटाळून चार मित्रांनी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आपण ओझं म्हणून जगण्यापेक्षा मेलेलं केव्हांही बर, अशी भावना मित्रांसोबत व्यक्त केली आहे. मृत्युमुखी पडलेले युवक हे अलवार जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जयपूरः राजस्थानमध्ये बेरोजगारीला कंटाळून चार मित्रांनी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आपण ओझं म्हणून जगण्यापेक्षा मेलेलं केव्हांही बर, अशी भावना मित्रांसोबत व्यक्त केली आहे. मृत्युमुखी पडलेले युवक हे अलवार जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस अधीक्षक राजेंद्र सिंह सांगितले की, अलवार जिल्ह्यातील राजगड-रैनी या गावात राहणाऱ्या मनोज मीना (वय 24), सत्यनारायणन मीना (वय 22), रितूराज मीना (वय 17) आणि अभिषेक मीना (वय 18) या चौघांनी बेरोजगारीला कंटाळून आलेल्या नैराष्यामुळे धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. रेल्वेसमोर उडी घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत मित्र राहुल (वय 18) आणि संतोष (वय 19) हे होते. त्यांच्या डोळ्यादेखतच या चौघांनी रेल्वेसमोर उडी मारली. आत्महत्या करण्यापूर्वी आपण ओझं म्हणून जगतोय अशी भावना त्यांनी राहुल व संतोष सोबत व्यक्त केली होती. शिवाय, तुम्ही देखील आत्महत्या करणार असेही विचारले होते. मात्र, दोघांनी नकार दिला होता. याबाबत पुढील तपास करत आहोत.

रितूराज हा कला शाखेच्या प्रथम वर्षात शिकत होता. सत्यनारायणन आणि मनोज हे दोघेही पदवीधर होते. दोघेही स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. अभिषेक विज्ञान शाखेतील प्रथम वर्षात नापास झाला होता. रितूराजचे वडील पोलिस दलात आहेत. अभिषेकच्या वडिलांची दुधाची डेअरी आहे. सत्यनारायणनच्या कुटुंबीयांची शेती आहे. चौघांच्याही कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताची. आत्महत्येमागे वेगळे कारणही असू शकते, अशी शक्यता एका पोलीस अधिकाऱ्याने वर्तवली.

दरम्यान, चौघांच्या आत्महत्येनंतर राजकारण सुरु झाले आहे. भाजपाने पाच वर्षात 10 कोटी रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात 8.5 लाख जणांनाच रोजगार मिळाला. केंद्र सरकारमुळेच तरुणांवर ही वेळ ओढावली, असे काँग्रेसने म्हटले आहे.

Web Title: Four Friends Jump Before Moving Train in Rajasthan