रेल्वेने प्रवास करताय? होतोय उष्माघाताने मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जून 2019

- वाढत्या उन्हामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या 5 प्रवाशांची प्रकृती अचानक खालावली.

- याचदरम्यान यातील चार प्रवाशांचा दुर्दैवाने झाला मृत्यू.

नवी दिल्ली : सध्या देशभरात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे उन्हाचा त्रासही प्रचंड होत आहे. असे असताना रेल्वेने प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशातील आग्रा ते झांशीदरम्यान संबंधित प्रवाशी केरळ एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमधून प्रवास करत होते. मात्र, उन्हाचा प्रचंड कडाका आणि उष्माघातामुळे या चारही प्रवाशांचा प्रवासादरम्यानच दुर्दैवाने मृत्यू झाला. केरळ एक्स्प्रेस निजामुद्दीनपासून त्रिवेंद्रमला जात होती. त्यानंतर आग्रापासून ट्रेन निघाल्यानंतर रेल्वेतील 5 प्रवाशांची प्रकृती खालावली. याचदरम्यान यातील चार जणांचा मृत्यू झाला. ही बाब समोर आल्यानंतर झांशी रेल्वे स्थानकावर या चारही प्रवाशांचा मृतदेह उतरविण्यात आला.

दरम्यान, या घटनेवरून रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही माहिती अद्याप दिली गेली नाही. मात्र, रेल्वेतील या चार प्रवाशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबतची माहिती शवविच्छेदन अहवालातूनच स्पष्ट होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Kerala Express passengers die due to heat in Jhansi