छत्तीसगडमध्ये चकमकीत चार नक्षलवादी ठार

Four Naxals Killed in Encounter with Security Forces in Chhattisgarh
Four Naxals Killed in Encounter with Security Forces in Chhattisgarh

रायपूर : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात आज (मंगळवार) सकाळी सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत चार नक्षलवादी ठार झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस अधिकारी सुंदरराज पी. यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंतलनार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात आज सकाळी सहाच्या सुमारास कारवाई झाली. काल सायंकाळी कर्कांगुडा गावाजवळील जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती सीआरपीएफला मिळाली होती. त्यानुसार कमांडोंनी कर्कांगुडाजवळील जंगलास वेढा घातला. या वेळी नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. त्याच वेळी जवानांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात चार नक्षलवादी मारले गेले. घटनास्थळी शस्त्रसाठा जप्त केला आहे. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, छत्तीसगडमध्ये 11, 18 व 23 एप्रिल रोजी या तीन टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होत आहे. सुकमा जिल्हा नक्षलग्रस्त असन, येथे 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com