ट्रक उलटून चार जण ठार 

पीटीआय
रविवार, 24 जून 2018

वाळूने भरलेला ट्रक कारला ओव्हरटेक करताना उलटल्याने झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले त्यात दोन अल्पवयीनांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.
 

उन्नाओ: वाळूने भरलेला ट्रक कारला ओव्हरटेक करताना उलटल्याने झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले त्यात दोन अल्पवयीनांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.

हा अपघात काल रात्री झाला त्या वेळी कार बंगारमाऊकडे चालली होती. त्या वेळी विरुद्ध बाजूकडून आलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले तो कारवर कोसळला. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार झाले.

त्यातील एकाचा तर जागेवरच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. हिरालाल (वय 40), त्यांची पत्नी निर्मला (वय 35), मुलगी वैष्णवी (वय 11), मुलगा सूरज (वय 9) आणि सर्वन (वय 45) अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: Four people were killed in a truck accident

टॅग्स