सिकंदराबाद-पाटणा चार विशेष गाड्या

यूएनआय
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

हैदराबाद - छटपूजेच्या काळातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन सिकंदराबाद-पाटणादरम्यान दोन सुविधा आणि दोन जनसाधारण विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने केला आहे.

हैदराबाद - छटपूजेच्या काळातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन सिकंदराबाद-पाटणादरम्यान दोन सुविधा आणि दोन जनसाधारण विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने केला आहे.

सिकंदराबाद-पाटणा सुविधा विशेष ही गाडी दोन नोव्हेंबरला (बुधवार) सायंकाळी 6.20 वाजता निघून शनिवारी पहाटे 2.50 वाजता पाटण्याला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी पाटणा-सिकंदराबाद ही गाडी पाटण्याहून आठ नोव्हेंबरला (मंगळवार) सकाळी साडेआठ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता सिकंदराबादला येईल. सिकंदराबाद-पाटणा जनसाधारण विशेष गाडी तीन नोव्हेंबरला (गुरुवार) सायंकाळी 6.20 वाजता सिकंदराबादहून सुटेल आणि शनिवारी पहाटे 2.50 वाजता पाटण्याला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी सात नोव्हेंबरला (सोमवार) सायंकाळी साडेसहा वाजता पाटण्याहून सुटेल आणि बुधवारी रात्री साडेबारा वाजता सिकंदराबादला पोहोचेल. काझीपेठ-रामगुंडम-बेलमपल्ली-सिरपूर कागजनगर-बल्लारशहा-नागपूर-इटारसी-जबलपूर-कटनी-सतना-माणिकपूर-मुघलसराय-बक्‍सर-आरा आणि दानापूर या मार्गाने या गाड्या धावतील.

Web Title: Four special trains from Sikarandabad-patana