गुरुग्राम : लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चौघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fraud crime
गुरुग्राम : लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चौघांना अटक

गुरुग्राम : लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चौघांना अटक

गुरुग्राम : होलीडे पॅकेजची ऑफर (holiday package offer) देऊन देशातील अनेक लोकांना लाखो रुपयांचा गंडा (Money fraud crime) घालणाऱ्या टोळीचा फरिदाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला असून याप्रकरणी चार संशयीतांना (Four suspects arrested) अटक करण्यात आलीय. उत्तम सिंग, तुषार, मोहम्मद मुबीन आणि मज अहमद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी बॅंकेचे अधिकारी असल्याचा दावा करुन क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना होलीडे पॅकेजची ऑफर द्यायचे. त्यानंतर त्यांची आर्थिक फसवणूक करायचे. गेल्या सहा महिन्यात आरोपींच्या बॅंक खात्यात तब्बल ६५ लाखांहून अधिक रुपयांचे व्यवहार झाले असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आलीय. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. (Four suspects arrested for cheating several people across the country)

हेही वाचा: Punjab : 4 आमदारांची तिकिटे कापली,बॉलिवूड स्टारच्या बहिणीला संधी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जस्ट डायल अॅपच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांचे संपर्क क्रमांक खरेदी केले. त्यानंतर आरोपी त्यांना क्रेडिट कार्डवर असलेल्या सुविधांमध्ये होलीडे ऑफरबाबत खोटी माहिती द्यायचे. त्यानंतर लोकांकडून कार्ड नंबर, सीवीवी, एक्स्पायरी डेट, ओटीपीची माहिती घेवून त्यांच्या कार्डद्वारे आरोपी त्यांच्या बॅंक खात्यात पैशांचे व्यवहार करायचे. "बँकेच्या कस्टमर केअरचा कॉल समजून अनेकदा लोकं सायबर गुन्हेगारांच्या सापळ्यात अडकतात." अशी माहिती फरीदाबादचे डीसीपी नितिश अग्रवाल यांनी दिलीय.

अटक केलेल्या आरोपींकडून १७ मोबाईल फोन, १८ सिम कार्ड, कंम्युटर आणि प्रिंटर पोलिसांनी जप्त केलंय. फरिबादच्या सायबर पोलीस स्टेशनमध्येही फसवणूक झालेल्या नागरिकांनी आरोपीं विरोधात तक्रार दाखल केलीय. "या टोळीनं तब्बल ५५ फसवणुकीचे गुन्हे केले आहेत. दिल्लीत १७, उत्तरप्रदेशात १५, तेलंगणात ९, हरयाणात ५, महाराष्ट्रात ३, गुजरातमध्ये २ तर आसमा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 3 गुन्ह्यांची नोंद या आरोपीं विरोधात झाली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिलीय. तसंच फरिदाबादच्या सायबर पोलीस स्टेशनचे एसएचओ बसंत कुमार यांनी सांगितलं की, आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलचे स्कॅनिंग केल्यानंतर या गुन्ह्यांची माहिती मिळाली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Gurugramcrime update
loading image
go to top