जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा 

वृत्तसंस्था
Monday, 8 June 2020

जम्मू-काश्मीरमध्ये आज (ता. ०८) सोमवारी सकाळी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक झाली. या चकमकीत भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये आज (ता. ०८) सोमवारी सकाळी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक झाली. या चकमकीत भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. याबाबत अधिकृत वृत्त एएनआयने दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शोपियाँ जिल्ह्यातील पिंजोरा भागात ही चकमक झाली असून जम्मू-काश्मीर पोलिस आणि लष्कराने संयुक्तरित्या ही मोहिम राबवली असल्याची प्राथमिक माहिती आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

दरम्यान, जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक देश त्याचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरसह देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती यावरून तरी कमी होताना काही दिसत नसून त्या दिवसेंदिवस वाढतच आहेत.

जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात रविवारीही सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांत मोठी चकमक झाली होती. जवानांनी ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. सुरुवातीला झालेल्या गोळीबारानंतर रेबन गावात सुरू असलेला गोळीबार काही वेळासाठी थांबा होता. मात्र, तो पुन्हा सुरू झाला. सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद्यांना शोधत असतानाच, दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमक उडाली. यामध्ये ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four terrorists killed in encounter in Jammu and Kashmir's Shopian