महिलांच्या सुरक्षिततेसाठी चार हजार सीसीटीव्ही कॅमेरे

महिलांच्या सुरक्षिततेसाठी चार हजार सीसीटीव्ही कॅमेरे

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील संवेदनशील ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी चार हजार 388 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाला दिली.

दिल्ली विद्यापीठाच्या उत्तर कॅम्पसच्या आसपास आपल्यावर पाण्याचे फुगे फेकल्याची तक्रार या महिलांनी वकिलांच्यामार्फत उच्च न्यायालयात केली होती. या याचिकाकर्त्यांनी होळी आणि नववर्षाच्या दिवशी महिलांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित करण्याची मागणी केली होती.

दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्यायाधीश व्ही. के. राव यांच्या खंडपीठासमोर पोलिसांनी आपले शपथपत्र दाखल केले. मात्र शुक्रवारी एक न्यायाधीश नसल्याने त्यावर सुनावणी होऊ शकली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com