पोलिस भरतीसाठी आलेल्या चार जणींना मोटारीने उडवले

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 मे 2018

आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पूर्व द्रुतगती मार्गावर चैताली दोरगे आणि तिच्या तीन मैत्रिणी काजल करडे, दिपाली काळे, चित्राली पांगे या रस्त्यावरुन जात होत्या. त्यावेळी त्यांना एका मोटारीने धडक दिली.​

मुंबई -  सध्या मुंबई पोलिस भरती चालू आहे. या पोलिस भरतीसाठी मुंबईत आलेल्या चारजणींना मोटारीने धडक दिली. मैदानावरुन धावण्याची चाचणी पूर्ण करुन विक्रोळी स्थानकांकडे जात असताना हा अपघात घडला. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पूर्व द्रुतगती मार्गावर चैताली दोरगे आणि तिच्या तीन मैत्रिणी काजल करडे, दिपाली काळे, चित्राली पांगे या रस्त्यावरुन जात होत्या. त्यावेळी त्यांना एका मोटारीने धडक दिली. या प्रकरणी चैत्रालीने विक्रोळी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मोटारचालकास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: four young girls hit by car